Eknath Shinde – गटातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण आणि तरुणांसाठी उद्योगाच्या संधी उपलब्ध करुन देवून कुसुंबी गटातील जनतेच्या विकासासाठी आम्ही कटिबध्द राहू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कुसुंबी गटातून विजयी झालेल्या शिवसेनेच्या उमेदवार जिल्हा परिषद सदस्या कविता ओंबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत मंत्रालयात भेट घेतली. यावेळी ते बोलत होती. या भेटीत शिवसेनेचे सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख नंदू गोरे, सचिन शेलार, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख प्रशांत जुनघरे, तालुकाप्रमुख समीर गोळे, सुधीर करंदकर, विजय धनावडे, दत्ता ओंबळे, प्रणव सावले, संदीप कासुर्डे आणि बाळासाहेब शिर्के उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्थानिक नेतृत्वाच्या कार्याचे कौतुक केले. भगव्याची उंची तुम्ही वाढवली असल्याचे सांगत त्यांनी जिल्हा परिषद सदस्य सौ. कविता ओंबळे यांचे अभिनंदन केेले. तसेच त्यांनी स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देऊन आवश्यक ते सहकार्य व निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ग्वाही सौ. कविता ओंबळे यांना दिली.