Eknath Shinde Hospitalised : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल
Eknath Shinde Hospitalised : ताप, अशक्तपणा जाणवत असल्याने उपचार सुरू

Eknath Shinde Hospitalised : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शुक्रवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कामाचा अतिताण आणि दगदग याचा परिणाम एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवर झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना एकनाथ शिंदे यांना ताप आला होता आणि त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत होता.
काल ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात दुपारच्या सुमारास धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.
यानंतर एकनाथ शिंदे हे तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचेही सांगितले जात आहे.
शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र अखेर शुक्रवारी रात्री 2 वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांचा ठाण्यात शिंदेसेनेत पक्षप्रवेश झाला.
हेही वाचा:





