Eknath Shinde :मोठी घडामोड..! एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? पुण्यातील ‘त्या’ बॅनरने राजकीय चर्चांना उधाण
Eknath Shinde : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात राजकीय फ्लेक्सबाजीला उधाण आले असून एका बॅनरने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.

Eknath Shinde : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात राजकीय फ्लेक्सबाजीला जोर आला आहे. हांडेवाडी परिसरात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी लावलेला एक फ्लेक्स सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. (Eknath Shinde)
या फ्लेक्सवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असून, त्यावर ‘लाडका भाऊ लवकरच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार’ असा थेट मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच ‘लाडक्या बहिणींचा आशीर्वाद’ असाही उल्लेख करण्यात आला आहे. फ्लेक्सवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटोही लावण्यात आले आहेत. (Eknath Shinde)
शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार?
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांच्या चर्चांमुळे या तर्कांना आणखी हवा मिळाली आहे. (Eknath Shinde)
त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस हे उपपंतप्रधान होण्याची शक्यता असल्याचा दावा यापूर्वी केला होता. या पार्श्वभूमीवर पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात एकनाथ शिंदे यांना थेट ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून संबोधणारा फ्लेक्स झळकल्याने महायुतीच्या राजकारणाबाबत चर्चांना उधाण आले आहे. (Eknath Shinde)
दहीहंडीच्या मुहूर्तावर फ्लेक्सची चर्चा
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने झळकलेल्या या फ्लेक्सने पुण्यातील नागरिक आणि शिवसेना कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, या फ्लेक्समुळे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. हा दावा किंवा राजकीय संदेश स्थानिक पातळीवरील नेत्याकडून करण्यात आलेला असल्याचे पाहायला मिळते. (Eknath Shinde)
महायुतीच्या समीकरणांवर परिणाम होणार?
एकनाथ शिंदे यांना ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून प्रोजेक्ट करणाऱ्या या फ्लेक्समुळे महायुतीतील मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. आता या फ्लेक्सवर भाजप किंवा शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया येते का, तसेच आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाबाबत काही बदल होतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Eknath Shinde)






