Raj Thackeray : “पुढच्या पाच महिन्यात देशात गडबड होईल”; राज ठाकरेंचे मोठे संकेत
देशात पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल. छोटा काळ असा येईल, जेव्हा देशाला पंतप्रधान नसेल, असे संकेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले आहेत.

Raj Thackeray – देशात पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल. छोटा काळ असा येईल, जेव्हा देशाला पंतप्रधान नसेल, असे संकेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले आहेत. शिवसेना दसरा मेळाव्यातून ठाकरेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला.
देशात हुकूमशाही सुरू असल्याचे सांगत आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच, एप्रिल महिन्यात पंतप्रधान मोदी सत्तेतून जातील असा दावाही राऊतांनी केला. राऊतांच्या या वक्तव्याला ठाकरेंनी दुजोरा दिला आहे.
ठाकरेंनी म्हटले की, संजय राऊत यांनी रेजीम चेंजबद्दल म्हटले, माझे त्यांच्याशी बोलणे झाले. पुढच्या दोन-पाच महिन्यात देशात काहीतरी मोठे होईल. एपस्टिन बरोबरचा फोटो बाहेर आला आहे, खूप गोष्टी बाहेर येणार आहे, हे थांबणार नाही. सरकार चुकांवर चुका करत राहणार आणि ही गोष्ट थांबणार नाही. येत्या काही वर्षात देश रस्त्यावर आला तर नवल वाटणार नाही, अशा शब्दात ठाकरेंनी भाकीत केले.
पुढे छोटा काळ असा येईल जिथे देशाला पंतप्रधानच नसेल, असेही राज ठाकरेंनी म्हटले. आंदोलनात अराजकता कुठे आली, शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर तुम्ही लाठीचार्ज केला. त्या मुलांनी काहीच केले नव्हते. भाजप जुने दिवस विसरले काय? पुढच्या वेळेस त्यांचे छायाचित्र लावा, असे म्हणत ठाकरेंनी आंदोलकांची बाजू घेतली.
बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी
ठाकरे म्हणाले, मी 2018 पासून बॅलेट पेपरवर वोटिंग व्हावे, असे प्रयत्न करत आहे. आधी लोकांना कळत नव्हते, मात्र आता कळत आहे. मतदान करतो त्याचे समाधान मिळाले पाहिजे. मतदान पेटीत टाकले आहे हे समाधान पाहिजे, हरणे जिंकणे हा वेगळा विषय आहे.
पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ इथे पण बॅलेट पेपरवर मतदान होतात. पुढारलेला देश आहे, तिथे बॅलेटवरच मतदान होते, असे म्हणत ठाकरेंनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली.
विधानसभा लोकसभा एकाच वेळी होत नाही. मतमोजणी पटापट होते, मात्र आम्हाला निकाल उशिराच मिळतात ना. चार दिवस लागले तरी चालेल, घाई कोणाला आहे. बॅलेट पेपरवर मतदान व्हायला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.





