Eknath Shinde : तुम्हाला भेटल्यानंतर आत्महत्येचा विचार दूर झाला; अकोल्यात शिंदेंच्या समोर शेतकरी भावुक
Eknath Shinde : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भातील अकोला जिल्ह्याचा दौरा करून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली.

Eknath Shinde : तुम्हाला भेटल्यानंतर आत्महत्येचा विचार दूर झाला, असे म्हणत व्याळा गावातील शेतकरी समाधान सुरकर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतांना भावनांचा बांध फुटल्याचे दिसून आले. (Eknath Shinde)
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे यांनी विदर्भातील अकोल्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. अकोला दौऱ्यावर असताना दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याची व्यथा ऐकताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. (Eknath Shinde)
समाधान सुरकर यांची बाळापुर तालुक्यातील कान्हेरी गवळी गावात पाच एकर शेती… सोयाबीन आणि तुरीचं पीक… मात्र पावसाअभावी शेतीची झालेली अवस्था सांगताना सुरकर भावुक झाले. मनात आत्महत्येचा विचार आला होताय… मात्र आज तुम्हाला भेटल्यानंतर तो विचार मनातून दूर झाला, अशी आपली व्यथा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. (Eknath Shinde)
एकनाथ शिंदे म्हणाले, नैसर्गिक संकटामुळे कोणीही हताश होऊ नका. शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून संकटाच्या काळात त्याला मदतीचा हात देणे ही सरकारची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून त्यांच्यासाठी भरघोस मदत केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. (Eknath Shinde)
पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मदतीबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली असून लवकरच यासंदर्भात अधिसूचना काढण्यात येईल. येणारी दिवाळी शेतकऱ्यांसाठी काळी होऊ देणार नाही, असे सांगत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde)





