नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकेकाळी भाजपचा राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा प्रमुख चेहरा म्हणून एकनाथ खडसेंकडे पाहिले जात होते. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडाव लागलं होतं. यानंतर त्यांचा पक्षातील वावर थोडा कमी झाला होता. यानंतर एकनाथ खडसेंनी मोठा निर्णय घेत कोरोनानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत हाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर शरद पवार यांनी एकनाथ खडसेंना विधान परिषदेची आमदारकी दिली तसेच रावेर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. मात्र रावेर लोकसभा लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांची सुन रक्षा खडसेंना भाजपकडून तिकीट जाहीर झाल्याने खडसेंनी निवडणुकीतून माघार घेतली. सोबतच रक्षा खडसे यांच्यासाठी काम करणार असल्याचं म्हणत पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तेंव्हापासून खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. मात्र लोकसभेची निवडणुक झाल्यानंतरही खडसेंचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही. आता तो लवकरच होईल, असे समजत आहे. कारण एकनाथ खडसेंनी आपल्या सुनबाई रक्षा खडसेंबरोबर गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये एकनाथ खडसे आणि अमित शहा यांची राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चाही झाली. एकनाथ खडसे हे पुर्वी भाजपमध्ये असताना त्यांनी अमित शहाणा यांची अनेक वेळा भेट घेतली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून दोघांची एकदाही भेट झाली नव्हती. या भेटीत खडसे यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी खडसे भाजपवासी होऊ शकतात, अशी माहिती आहे. माझा पक्षप्रवेश दिल्लीत होईल, असं खुद्द एकनाथ खडसे यांनी याआधीच सांगितलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश कधी होणार? त्यांच्या पक्षप्रवेशावेळी कोण कोण उपस्थित राहणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.