Bus Accident – धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जय हिंद विद्यालयाच्या शैक्षणिक सहल एसटी बसला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील खाक्षी घाट परिसरातील तीव्र वळणावर गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. सदर बस चालकाच्या प्रसंगावधातेने ४० विद्यार्थी सुदैवाने बचावले. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, कोकणात शालेय सहलीचा हंगाम सुरु झाला आहे. देवगडहून कुणकेश्वरकडे जाणारी धाराशीव तालुक्यातील तडवळे(कसबे) येथील जयहिंद विद्यालयाची शैक्षणिक सहलीच्या एसटी बसला खाक्षी घाट परिसरातील तीव्र वळणावर गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. एसटी बस चालकाच्या प्रसंगावधातेने नजीकच्या देवगड प्रादेशिक नळपाणी योजनेच्या पाईप लाईनला धडकली व भेंडले माडावर जाऊन नजीकच्या झाळीत अडकली. यावेळी एसटीत सुमारे ४० विद्यार्थी होते. यात ४ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून सर्वजण सुखरुप आहेत.