Rahul Gandhi : “शिक्षण हा हक्क, उपेक्षित विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष नको” – राहुल गांधी
नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यामध्ये त्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Rahul Gandhi – शिक्षण हा विशेषाधिकार नसून भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांकडे व्यवस्थेकडून दुर्लक्ष होऊ नये, असे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यामध्ये त्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
आदिवासींसाठी असलेल्या आश्रमशाळांच्या स्थितीसह अनेक मुद्द्यांवर विद्यार्थी आंदोलन करत होते. राहूल गांधींनी एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटलेकी , शिक्षण हा विशेषाधिकार नाही, तो भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे.
नाशिक दौऱ्यात त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्या समस्या व मागण्या काळजीपूर्वक ऐकून घेतल्याचे म्हटले. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या अभ्यासासाठी आदरयुक्त, सुरक्षित आणि अनुकूल वातावरण मिळण्याचा अधिकार आहे.
उपेक्षित समुदायातील विद्यार्थ्यांकडे व्यवस्थेकडून दुर्लक्ष होऊ नये, त्यांना त्याच्या समर्थनाची आणि शक्य तितक्या मदतीची गरज आहे. आपल्या नाशिक दौऱ्यात राहूल गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेत्यांशी संवाद साधला आणि त्यांना पक्षाच्या विचारसरणीशी ठामपणे उभे राहून जनतेला न्याय मिळवून देण्यास सांगितले.






