ज्ञानदीप लावू जगी
Updated On:

-राजाराम महाराज फड
तिर्थे बाह्यमळ क्षाळे । कर्मे अभ्यंतर उजळे।।
एवं तिर्थे जाण निर्मळे । सत्कर्मेची ।।
माऊली म्हणतात, पाणी फक्त शरीराचा बाह्यमळ धुऊन काढतं. मात्र सत्कर्माने अभ्यंतर उजळून निघत. सत्कर्म पापच नाही तर पापाची समूळ वासनाच धुऊन टाकतं.
म्हणून माऊली म्हणतात, सत्कर्मच खरी तिर्थे, निर्मळ तिर्थे आहेत. सत्कर्म आणि सज्जन या दोही शब्दांतही अस् धातूच सत् रूप आहे. म्हणजे सत्कर्म करणारा जो कोणी आहे तोच सज्जन आहे. आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी कसे सदाचाराने वागतो तसेच हे संपूर्ण जग आपलं कुटुंब आहे.
वसुधैव कुटुंबकम् या विचाराने सर्वांनी सदाचारी आचरण करावे. प्रकृतीही आपल्या आचरणाने समृद्ध व्हावी व ती कायम निरोगी, चिरतरूण राहावी. जेणेकरून हे विश्वच तीर्थ होईल. त्यासाठी सर्वांनाच तशी सद्बुद्धी होवो अशी आशा करूया.





