46 वर्षांपूर्वी प्रभात : सीमा भागातील कानडी भाषेची सक्ती उठवावी

सीमा भागातील कानडी भाषेची सक्ती उठवावी
पुणे, दि. 4 – महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमा भागात कानडी भाषेची सक्ती करण्यात आली आहे. अशी सक्ती उठवावी, अशा मागणीसाठी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेली तहकुबी आज एकमताने संमत करण्यात आली.
देश बलवान होण्यासाठी मजबूत केंद्राची जरुरी
रायरंगपूर – देश बलवान व समृद्ध बनविण्यासाठी सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार मजबूत असणाच्या जरुरीवर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भर दिला आहे.
चित्रपट हा जनतेच्या जीवनाचा आरसा
नवी दिल्ली – जनतेच्या आशा-आकाक्षाशी सुसंगत अशी चित्रपटनिर्मिती होणाच्या गरजेवर उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांनी भर दिला आहे. चित्रपट हा सामान्य माणसाच्या जीवनाचा आरसा आहे. त्या दृष्टीने चित्रपट निर्मात्यांनी कलात्मकतेबरोबरच जबाबदारीचीही जाणीव ठेवावी.
लोक खुजे होत आहेत
भूवनेश्वर – गेल्या एक दोन पिढ्यांमध्ये भारतीय लोक बुटके झाले आहेत. हे मानववंश शास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत आढळले. अपुऱ्या आहार सवयीचा हा नैसर्गिक परिणाम असावा.





