Vinod Patil ED Enquiry | आगामी महापालिकेच्या निवडणुकांदरम्यान मनसे नेते राजू पाटलांच्या भावाच्या ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. राजेंद्र लोढा यांच्याशी संबंधित कथित आर्थिक फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांची चौकशी करण्यात आली. ईडीचे अधिकारी बुधवारी (ता. 12 नोव्हेंबर) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विनोद पाटील यांच्या निवसास्थानात गेले आणि तपासणी सुरू केली. जवळपास 10 तास विनोद पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय? लोढा ग्रुपचे विश्वस्त असलेले राजेंद्र लोढा यांच्यावर ग्रुपचा विश्वासघात आणि आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. हा कथित घोटाळा हजारो कोटी रुपयांचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या आर्थिक ट्रान्झेक्शनमध्ये मनसे नेते राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांचं नाव समोर आलं. लोढा ग्रुपचे विश्वासघात आणि फसवणूक प्रकरणी ईडीकडून तपास केला जात आहे. Vinod Patil ED Enquiry | 1994 पासून पाटील कुटुंबीय आणि लोढा यांच्यात आर्थिक संबंध असल्याचे समोर आले आहे. त्या काळातील काही जुने व्यवहार आणि निधी हस्तांतरणाचा हेतू काय होता, याबाबत ईडीने सविस्तर विचारपूस केली. लोढा ग्रुपच्या व्यवहारातील आर्थिक अनियमिततेबाबतचा तपास आता ईडीकडे असल्याने पुढील काही दिवसांत आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी विनोद पाटील यांचा जबाब घेतल्यानंतर टीम मुंबईकडे रवाना झाली. या चौकशीमुळे डोंबिवली आणि ठाणे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. Vinod Patil ED Enquiry | राजू उर्फ प्रमोद रतन पाटील हे मनसे पक्षाचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले एकमेव आमदार होते. मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला. कल्याण ग्रामीणचे आमदार म्हणून काम पाहिलेले आणि व्यावसायिक असणाऱ्या राजू पाटील यांचे आर्थिक व्यवहार हे विनोद पाटील सांभाळत असल्याची माहिती आहे. त्यामुळेच विनोद पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. Vinod Patil ED Enquiry | हेही वाचा : satara news: बिचुकलेतील ‘चांगलं चाललंय’ ची थीम ठरतेय लक्षवेधी