Durva Health Benefit | Ganesh Chaturthi 2024 – यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबरपासून सुरू झाली असून 17 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपतीची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते. श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी लोक मनोभावे देवाचे पुजा करत असतात. यावेळी गणेशाला त्याच्या प्रिय दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात.
दुर्वा हे गणरायाला अतिशय प्रिय असते. पण दुसरीकडे परंतु आयुर्वेदात दुर्वा एक शक्तिशाली औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते. याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर चांगला फायदा होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला ‘दुर्वा’वनस्पतीचे शक्तिशाली फायदे सांगणार आहोत. या गवतामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराला लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.
दुर्वा गवताची उंची साधारण 6 ते 7 इंच असते. हे गवत अतिशय पातळ असण्यासोबतच जमिनीवर पसरत वाढते. या गवतामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम आणि कर्बोदके आणि विषाणूविरोधी, सूक्ष्मजीवविरोधी, दाहक-विरोधी आणि जंतुनाशक गुणधर्म असतात.
दुर्वा 15 रोगांवर लाभदायक:
- नाकातून रक्त येणे
- पचन समस्या
- उच्च रक्तदाब
- त्वचेची समस्या
- लठ्ठपणा
- अशक्तपणा
- डोळ्यांची कमजोरी
- मानसिक आरोग्य
- मलेरिया
- मूळव्याध
- अपस्मार
- लैंगिक समस्या
- तोंडाचे व्रण
- मूत्रमार्गात संक्रमण
- पित्ताचा आजार
दुर्वा सेवन कसे करावे:
सकाळी रिकाम्या पोटी दुर्वा सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. तुम्ही ते सुकवून पावडर बनवू शकता आणि दररो एक चमचा दुधासोबत सेवन करू शकता. किंवा त्याचा रस काढून देखील पिऊ शकता.
हे नक्की लक्षात ठेवा:
दुर्वा जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्वचेची जळजळ, खाज सुटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, ते घेण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.