Duleep Trophy 2025 : झारखंडच्या पठ्ठ्याने रचला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला भारताचा पहिला अन् जगातील सहावा गोलंदाज

Jharkhand spinner Manishi record in Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफी 2025 च्या क्वार्टर फायनलमध्ये ईस्ट झोन संघातील झारखंडच्या युवा फिरकीपटू मनीषीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याने जागतिक विक्रमाची बरोबरी केली आहे. पहिल्यांदाच दलीप ट्रॉफीसाठी निवड झालेल्या 21 वर्षीय मनीषीने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 22.2 षटकांत 111 धावांत 6 विकेट्स घेतल्या. नॉर्थ झोनच्या दमदार फलंदाजीच्या आव्हानाला न जुमानता मनीषीने ईस्ट झोनच्या आशा कायम ठेवल्या.
भारताचा पहिला गोलंदाज ठरला मनीषी –
डावखुरा फिरकीपटू मनीषीने एका डावात 6 फलंदाजांना एलबीडब्ल्यू आउट करत प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात भारताचा पहिला गोलंदाज ठरण्याचा मान मिळवला. हा अनोखा विक्रम आतापर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये फक्त पाच गोलंदाजांनी नोंदवला आहे. मनीषीने शुभम खजुरिया (26), अंकित कुमार (30), यश धुल (39), कन्हैया वधावन (76), नबी (44) आणि हर्षित राणा (7) यांना एलबीडब्ल्यू आउट करत हा विक्रम आपल्या नावे केला. हर्षित राणाला आउट करताच त्याने हा ऐतिहासिक टप्पा गाठला.
या गोलंदाजांनी यापूर्वी केला होता हा पराक्रम –
Fantastic bowling performance from Manishi against North Zone 🔥#Manishi #DuleepTrophy #NorthZone #CricketTwitter pic.twitter.com/ZaAqz3nNwz
— CricketTimes.com (@CricketTimesHQ) August 29, 2025
हा विक्रम यापूर्वी इंग्लंडचे मार्क इलॉट (1995), ओली रॉबिन्सन (2021), क्रिस राइट (2021), श्रीलंकेचा चमिंडा वास (2005) आणि पाकिस्तानचा ताबिश खान (2011) यांनी नोंदवला आहे. मनीषी आता या यादीत सहावा गोलंदाज म्हणून सामील झाला आहे.
हेही वाचा – Womens World Cup 2025 : ICC ची मोठी घोषणा; महिला वनडे विश्वचषक विजेत्याला मिळणार पुरुषांपेक्षा जास्त बक्षीस!
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक फलंदाजांना एलबीडब्ल्यू आउट करण्याचा विक्रम:
- 6 LBW: मार्क इलॉट (एसेक्स वि. नॉर्थम्पटनशायर, 1995)
- 6 LBW: चमिंडा वास (वेस्टर्न प्रोव्हिन्स वि. सदर्न प्रोव्हिन्स, 2005)
- 6 LBW: ताबिश खान (कराची व्हाइट्स वि. खान रिसर्च लॅबोरेटरीज, 2011)
- 6 LBW: ओली रॉबिन्सन (ससेक्स वि. ग्लॅमरगन, 2021)
- 6 LBW: क्रिस राइट (लिसेस्टरशायर वि. ग्लॉस्टरशायर, 2021)
- 6 LBW: मनीषी (ईस्ट झोन वि. नॉर्थ झोन, 2025)
हेही वाचा – PKL 2025 : सुपर टॅकल ते ऑलआउट; यू मुंबाचा सलग दुसऱ्या सामन्यात दमदार विजय
कोण आहे मनीषी?
जमशेदपूर येथे जन्मलेला मनीषी हा डावखुरा फिरकीपटू आहे. गेल्या तीन वर्षांत त्याने केवळ 9 प्रथम श्रेणी सामने खेळले असले, तरी प्रत्येक सामन्यात त्याने आपल्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने 22 विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याची सरासरी 27.22 होती. आपल्या या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने निवड समितीचे लक्ष वेधले आणि ईस्ट झोनच्या संघात स्थान मिळवले.





