PKL 2025 : सुपर टॅकल ते ऑलआउट; यू मुंबाचा सलग दुसऱ्या सामन्यात दमदार विजय

U Mumba beat Tamil Talaivas in PKL 2025 : प्रो कबड्डी लीग (पीकेएल) च्या 12व्या हंगामाच्या तिसऱ्या दिवशी रविवार को विश्वनाध स्पोर्ट्स क्लब स्टेडियम येथे यू मुंबाने शानदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर तमिल थलाइवाजवर 36-33 अशी मात केली. यू मुंबाचा हा सलग दुसरा विजय ठरला, तर थलाइवाजला दोन सामन्यांत पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. यू मुंबाने हा सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. एका टप्प्यावर नऊ गुणांनी पिछाडीवर असतानाही त्यांनी अप्रतिम पुनरागमन केले.
यू मुंबाने दोनदा टाळला ऑलआउट –
यू मुंबाने दोनदा ऑलआउट टाळत सुपर टॅकलच्या साथीने स्कोअर बरोबरीत आणला आणि नंतर ऑलआउट करत आघाडी मिळवली. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली. अनिल मोहन (8 गुण) आणि अजित चौहान (9 गुण) या विजयाच्या शिल्पकारांनी रिंकू आणि लोकेश (प्रत्येकी 4 गुण) यांनी उत्तम साथ दिली. यामुळे अर्जुन देसवाल (12 गुण) आणि पवन सेहरावत (7 गुण) यांची चमक फिकी पडली.
रविवार हा फक्त #UMumba वार असतो! जिंकलो रे 💪🔥#ProKabaddi #PKL12 #GhusKarMaarenge #TamilThalaivas #UMumba pic.twitter.com/WDP0v6e3Dd
— ProKabaddi (@ProKabaddi) August 31, 2025
दोन्ही संघांनी मागील सामना जिंकलेला असल्याने सामन्याला सावध पण चांगली सुरुवात झाली. पहिल्या 6 मिनिटांत स्कोअर 4-4 असा बरोबरीत होता. मात्र, देसवालच्या मल्टीपॉइंट रेडमुळे थलाइवाजने 7-4 अशी आघाडी घेतली आणि यू मुंबाला सुपर टॅकलच्या स्थितीत आणले. 10व्या मिनिटात सुरेशच्या रेडवर लोकेश बॅकलाइनच्या बाहेर गेले, त्यामुळे यू मुंबा सुपर टॅकलमधून बाहेर पडला. त्यानंतर लोकेशने पवनला बाद करत स्कोअर 6-7 केला.
बरोबरीनंतर मुंबाने आघाडी घेतल्याने चुरस –
अजित चौहानच्या 200 रेड्सचा टप्पा पार! आमचा हिरो, आमचा शूरवीर 💪🔥#PKL12 #ProKabaddi #UMumba pic.twitter.com/8t2lrFwvKO
— ProKabaddi (@ProKabaddi) August 31, 2025
पहिल्या सत्रानंतर अडीच निटांच्या खेळात एकही गुण न नोंदवता अनिलने डू-ऑर-डाय रेडवर गुण मिळवत स्कोअर 7-7 असा बरोबरीत आणला. देसवालने डू-ऑर-डाय रेडवर यू मुंबाचा कर्णधार सुनीलला बाद केले. 9-7 अशा आघाडीवर देसवाल पुन्हा रेडवर आला आणि लोकेशला बाद करत यू मुंबाला ऑलआउटच्या उंबरठ्यावर आणले. मात्र, एकट्या राहिलेल्या अनिलने मल्टीपॉइंट रेडसह ऑलआउट टाळला. त्यानंतर अनिल आणि रिंकू यांनी देसवालवर सुपर टॅकल करत स्कोअर 11-12 केला.
हेही वाचा – Team India : आशिया कपपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! ‘या’ खेळाडूंनी पास केली फिटनेस टेस्ट
अखेर यू मुंबाने मारली बाजी –
पहिल्या सत्रात थलाइवाजने 14-11 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात ऑलआउटसह त्यांनी 17-11 असा फरक केला. अजितने पवन आणि सुरेशला बाद करत स्कोअर 20-14 केला. देसवालचा सुपर-10 आणि नितेशचा हाय-5 झाला, पण यू मुंबाने स्कोअर 23-17 केला. पवनमुळे फरक 9 गुणांवर गेला. सतीश-अजितने ऑलआउट टाळला. अनिलने पवनवर सुपर टॅकल आणि अजितने देसवालला बाद करत स्कोअर 26-28 केला. यू मुंबाने थलाइवाजला ऑलआउट करत 31-29 अशी आघाडी घेतली. थलाइवाजने 31-32 केला, पण परवेशने देसवालला बाद केले. पवनच्या चुकलेल्या रेडमुळे यू मुंबा 2 गुणांनी पुढे गेला. शेवटी अनिलने आघाडी 3 गुणांवर नेली आणि यू मुंबाने 36-33 ने विजय मिळवला.





