Womens World Cup 2025 : ICC ची मोठी घोषणा; महिला वनडे विश्वचषक विजेत्याला मिळणार पुरुषांपेक्षा जास्त बक्षीस!

Womens World Cup 2025 prize money : 30 सप्टेंबर 2025 पासून भारतात महिला वनडे विश्वचषकाला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. यंदा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला तब्बल 4.48 दशलक्ष डॉलर (39.4 कोटी रुपये) बक्षिस रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम 2022 मध्ये झालेल्या महिला विश्वचषकाच्या तुलनेत चारपट अधिक आहे. 2022 चा विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.
2023 पुरुष विश्वचषकापेक्षा जास्त बक्षीस रक्कम –
आठ संघांच्या या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम 13.88 दशलक्ष डॉलर आहे, जी 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषकाच्या 3.5 दशलक्ष डॉलरच्या तुलनेत 297 टक्के जास्त आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम 2023 पुरुष वनडे विश्वचषकाच्या 10 दशलक्ष डॉलरच्या बक्षीस रकमेपेक्षाही अधिक आहे.
उपविजेत्या आणि सहभागी संघांना मिळणार कोट्यवधी रुपये –
Breakdown of a grand prize money pool for #CWC25 🏆
More ➡️ https://t.co/oDGTG3zyx6 pic.twitter.com/OMzeveP3YA
— ICC (@ICC) September 1, 2025
उपविजेत्या संघाला 2.24 दशलक्ष डॉलर (19.71 कोटी रुपये) मिळतील, तर उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी 1.12 दशलक्ष डॉलर (9.8 कोटी रुपये) मिळतील. गट फेरीतील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला 34,314 डॉलर (30.19 लाख रुपये) मिळतील. पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघांना प्रत्येकी 7 लाख डॉलर (6.16 कोटी रुपये), तर सातव्या आणि आठव्या स्थानावरील संघांना प्रत्येकी 2.8 लाख डॉलर (2.46 कोटी रुपये) मिळतील. याशिवाय, स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघाला 2.5 लाख डॉलर (2.20 कोटी रुपये) मिळतील.
हेही वाचा – Team India : आशिया कपपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! ‘या’ खेळाडूंनी पास केली फिटनेस टेस्ट
महिला विश्वचषक 2025 साठी बक्षीस रक्कम –
- विजेता संघ: 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे 39.5 कोटी रुपये)
- उपविजेता संघ: 2.24 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (19.80 कोटी रुपये)
- उपांत्य फेरीतील पराभव: 1.12 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे 9.88 कोटी रुपये)
- पाचवे आणि सहावे स्थान: प्रत्येकी 7 लाख डॉलर्स (6.17 कोटी रुपये)
- सातवे आणि आठवे स्थान: 2 लाख 80 हजार डॉलर्स (प्रत्येकी 2.5 कोटी रुपये)
- प्रत्येक संघासाठी: प्रत्येकी 2.5 डॉलर्स (2.20 कोटी रुपये)
- गट टप्प्यातील एक सामना जिंकण्यासाठी: 34,314 डॉलर्स (30 लाख रुपये)
हेही वाचा – PKL 2025 : सुपर टॅकल ते ऑलआउट; यू मुंबाचा सलग दुसऱ्या सामन्यात दमदार विजय
जय शाहांचे मोठे वक्तव्य –
बक्षीस रकमेची घोषणा करताना आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले, “ही घोषणा महिला क्रिकेटच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. बक्षीस रकमेतील ही चारपट वाढ महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण आहे. यामुळे आमची दीर्घकालीन वाढीसाठीची स्पष्ट बांधिलकी दिसून येते. आमचा संदेश स्पष्ट आहे की. महिला क्रिकेटपटूंना हे माहीत असावे की, जर त्यांनी हा खेळ व्यावसायिकरित्या निवडला, तर त्यांच्याशी पुरुषांच्या बरोबरीने समान वागणूक दिली जाईल.”





