Jansen Twin Brothers : हुबेहूब चेहरा आणि दोघांचाही डाव्या हाताने मारा! आफ्रिकन संघात जुळ्या भावांची जोडी दाखल; कांगारू चक्रावणार
Jansen Twin Brothers : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे ओटनील बार्टमनला संघातून बाहेर पडला आहे.

Duan Jansen Replaces Injured Ottneil Baartman Joins Twin Brother Marco In South Africa ODI Squad : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात मोठा आणि अत्यंत रंजक बदल पाहायला मिळाला आहे. वेगवान गोलंदाज ओटनील बार्टमन (Ottneil Baartman) दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर ‘क्रिकेट दक्षिण आफ्रिका’ने (CSA) त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज डुआन यानसनची (Duan Jansen) संघात निवड केली आहे. या निवडीमुळे डुआन आता त्याचा जुळा भाऊ आणि स्टार अष्टपैलू मार्को यानसनसोबत (Marco Jansen) ड्रेसिंग रूम शेअर करताना आणि मैदानात एकत्र खेळताना दिसणार आहे.
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने बार्टमन बाहेर; वेगवान माऱ्याला दुसरा मोठा धक्का!
दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याला सध्या दुखापतींचे ग्रहण लागले आहे. देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटच्या सामन्यात ‘डॉल्फिन्स’ संघाकडून खेळताना ओटनील बार्टमनच्या डाव्या पायाची हॅमस्ट्रिंग दुखावली. अवघी पाच षटके टाकल्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले आणि तो दुसऱ्या डावात फलंदाजीलाही उतरू शकला नाही. या मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडणारा बार्टमन हा दुसरा गोलंदाज ठरला आहे; यापूर्वी स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा देखील हॅमस्ट्रिंगच्या त्रासामुळे आधीच मालिकेतून बाहेर झाला आहे.
नामिबिया दौऱ्यातील भेदक माऱ्याचे बक्षीस; डुआनची शानदार कामगिरी –
🚨 THE JANSEN BROTHERS ARE READY TO ROAR TOGETHER! 🇿🇦🔥
Twin brothers Marco Jansen and Duan Jansen are all set to represent South Africa together in the ODI series against Australia! 💚🤝
Two brothers, one nation, one dream! 💪🏏#MarcoJansen #DuanJansen #SAvsAUS pic.twitter.com/4g7t6wtWAn
— CricInformer (@CricInformer) September 13, 2026
डुआन यानसनला त्याच्या सद्यस्थितीतील उत्कृष्ट कामगिरीचे फळ मिळाले आहे. नामिबियाविरुद्धच्या टी-२० तिरंगी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम डुआनने केला होता; त्यानंतर दोन एकदिवसीय सामन्यांतही त्याने ५ गडी बाद करत आपली धारदार गोलंदाजी सिद्ध केली. विशेष योगायोग म्हणजे, ज्या प्रथम श्रेणी सामन्यात बार्टमन जायबंदी झाला, त्याच सामन्यात डुआनचा जुळा भाऊ मार्को यानसनने तब्बल ७ विकेट्स टिपून धुव्वा उडवला होता.
मैदानात उतरणार जुळे भाऊ; ऑस्ट्रेलियन फलंदाजांची उडणार भंबेरी –
क्रिकेटच्या इतिहासात जुळ्या भावांनी एकाच वेळी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणे ही अत्यंत दुर्मीळ आणि ऐतिहासिक घटना मानली जाते. मार्को यानसन आधीपासूनच दक्षिण आफ्रिकेचा मुख्य अष्टपैलू खेळाडू आहे. आता डुआनच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर एकाच चेहऱ्याच्या आणि शैलीच्या दोन डाव्या हाताच्या उंच वेगवान गोलंदाजांचा सामना करण्याचे अनोखे आव्हान उभे ठाकणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही जुळी जोडी पहिल्यांदाच एकत्र मैदानात उतरणार आहे.





