आदित्य ठाकरेंकडून ड्रम वादन; नेटकरी म्हणतात, ‘भाजप आणि शिंदे गटाचा असाच बँड वाजवणार’

मुंबई – शिवसेनेचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री ‘आदित्य ठाकरे’ यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, यामध्ये आदित्य ठाकरेंचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. नुकतंच आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील जुहू चौपाटी येथील ‘बिर्ला लेन’चं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी जवळच असलेल्या बिर्ला उद्यानात जाऊन नागरिकांशी संवाद साधला.
दरम्यान, यावेळी उद्यानात एक आफ्रीकन बेंजोचे ड्रम वादन सुरू होते. ते बघताच आदित्य ठाकरेंना ड्रम वाजवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी लगेच तिथे जाऊन ड्रम वाजवण्याचा आनंद लुटला. त्यांचा हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आदित्य ठाकरे ❤️❤️
असाच भाजप आणि शिंदे गटाचा बँड वाजवणार 👍🏻 pic.twitter.com/kJ5PuROSeH
— सुंदर 🙏🏻 (@Sundarspeak57) January 6, 2023
एका नेटकाऱ्यानी आपल्या ट्विटवर आदित्य ठाकरेंचा हा व्हिडिओ शेअर करत “आदित्य ठाकरे असाच भाजप आणि शिंदे गटाचा बँड वाजवणार.” असं कॅप्शन दिल आहे. मात्र, आता या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सध्या सगळीकडे आदित्य ठाकरेंच्या या व्हिडिओची चर्चा होत आहे.





