Drug addiction : ‘अमली पदार्थांचा तरूण पीढीला गंभीर धोका’; एकत्रितपणे लढा देण्याचा कोर्टाचा सल्ला

Drug addiction : देशातील तरुणांमध्ये वाढत्या अमली पदार्थांच्या व्यसनावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. देशातील अवैध ड्रग्सचा व्यापार आणि अंमली पदार्थांच्या सेवनावर त्यांनी चिंता व्यक्त करत ड्रग्ज घेणे अजिबात कूल नसल्याचे सांगितले. न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि एन कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने सांगितले की, अंमली पदार्थांचा दुरूपयोग निषिद्ध मानले जाऊ नये परंतु या समस्येचा सामना करण्यासाठी खुली चर्चा आवश्यक आहे.
न्यायमूर्ती नागरथना यांनी असा इशारा दिला की अंमली पदार्थांच्या वापराचे सामाजिक आणि आर्थिक धोक्यांसह मानसिक धोके देखील आहेत. तरुणांमधील वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यसनावर तातडीने सामूहिक कारवाई करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले. न्यायालयाने पालक, समाज आणि सरकार यांनी एकत्र येऊन या समस्येविरोधात लढा देण्यास सांगितले. भारतातील अंमली पदार्थांच्या मुद्द्यावर आपण मौन बाळगतो आणि दहशतवादाला आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देण्यासाठी याचाच वापर केला जात आहे.
मित्रांचा दबाव आणि शिक्षणाचा ताण यामुळे तरुणाई त्याचा अधिक वापर करत आहे. तरुणांनी अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्यांच्या मागे लागू नये आणि अंमली पदार्थांचा वापर हा केवळ वंचित वर्गापुरता मर्यादित नसून तो आर्थिक विवंचनेच्या पलीकडे जातो. ज्यांनी याचा आश्रय घेतला आहे त्यांना आपण सल्ला देणे आवश्यक आहे.
अमली पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्तीशी सहानुभूती आणि प्रेमाने वागण्याची गरज असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. पाकिस्तानातून भारतात 500 किलो हेरॉईनची तस्करी केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर खंडपीठ आपला निर्णय देत असताना सर्वोच्च न्यायालयाकडून ही टिप्पणी आली आहे.





