Pune District : पुरंदरच्या पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती
Updated On:

नायगाव : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी टँकरने पाणी आणून पिके वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत.
सध्या शेतीतील पिके जगविण्यासाठी पाणी मिळत नसल्याने व पिके जळू लागल्याने पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी सुभाष होले यांनी पाण्याचा टँकर विकत घेऊन पीक वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
10 दिवसांपासून त्यांनी हा प्रयत्न सुरु केला आहे. या वर्षी पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात कमी पाऊस झाल्यामुळे विहिरी, बोअरची पाणीपातळी खोलवर गेल्याने शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.
पुरंदर उपसा सिंचन योजना व जनाई उपसा सिंचन योजनांचे योग्य नियोजन नसल्याने व पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये सतत बिघाड होत असल्याने शेतकर्यांना वेळेवर पाणी मिळत नाही.





