Sandeep Singh Gill : अधिकारी व अमलदारांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद; पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी बदल्यांना दिली मंजुरी
पोलीस अधिकारी व अमलदारांच्या कौटुंबिक, शैक्षणिक तसेच वैद्यकीय अडचणींचा विचार करून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल (Sandeep Singh Gill) यांनी कर्मचाऱ्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Sandeep Singh Gill : पोलीस अधिकारी व अमलदारांच्या कौटुंबिक, शैक्षणिक तसेच वैद्यकीय अडचणींचा विचार करून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल (Sandeep Singh Gill) यांनी कर्मचाऱ्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यापूर्वी करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये काही कर्मचाऱ्यांना पाल्यांच्या शिक्षणासह कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय उपचारांबाबत अडचणी निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
या पार्श्वभूमीवर अनेक पोलीस अधिकारी व अमलदारांनी पुन्हा विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेत पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल (Sandeep Singh Gill) यांनी पुन्हा गॅझेट काढून प्रशासकीय १३३, विनंती ५३ आणि अशंता ६६ अशा एकूण २५२ बदल्यांना मंजुरी दिल्याने पोलीस दलातील अधिकारी व अमलदारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक अडचणींचाही विचार होणे आवश्यक आहे. पाल्यांचे शैक्षणिक वर्ष, कुटुंबातील सदस्यांचे आजारपण, उपचार तसेच इतर अपरिहार्य कारणांमुळे बदलीचे ठिकाण बदलणे गरजेचे असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे विनंती केली होती.
या विनंत्यांचा गांभीर्याने विचार करून पोलीस अधीक्षक गिल यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. “कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन निर्णय घेणारे नेतृत्व” अशी भावना पोलीस अधिकारी व अमलदारांकडून व्यक्त होत असून, या निर्णयामुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करत प्रशासन आणि पोलीस दल यांच्यातील समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. बदल्यांमुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक अडचणींची दखल घेऊन पुन्हा संधी देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल (Sandeep Singh Gill) यांच्याबद्दल समाधानाची भावना व्यक्त होत आहे.






