अष्टविनायक गणपतींसह 5 मंदिरात पोशाखाची नियमावली जारी; मंदिराच्या पवित्रतेचा आदर राखण्यासाठी निर्णय

Dress Code | राज्यातील देवस्थळांमध्ये भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आले आहेत. आता अष्टविनायक गणपतींसह 5 मंदिर व्यवस्थापनांकडून पोशाखाची नियमावली लागू करण्यात आली आहे.
अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांसह चिंचवडचा मोरया गोसावी संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ही 5 मंदिरे ज्या ट्रस्टच्या अंतर्गत येतात, त्या चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली.
अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यातील पाचही गणपती मंदिरात आता परिपूर्ण आणि अंगभरुन पोशाख घालूनच भाविकांनी दर्शन घेतले पाहिजे. ही सक्ती नाही तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करुन दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आल्याचंही चिंचवड देवस्थान ट्रस्टचं म्हणणं आहे. Dress Code |
अष्टविनायक यात्रा पुण्यापासून सुमारे 850 किलोमीटर प्रवास करत रायगड आणि पुणे जिल्ह्यातील श्री गणेश मंदिरांचे दर्शन भाविकांना करायला मिळते. या यात्रेत मोरेगावच्या मोरेश्वराचे पहिले मंदिर असून पुढील चार मंदिरे पुण्यापासून दूर आहेत. मोरेश्वर मोरेगाव, सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांझणगावचा आहे. Dress Code |
मंदिर प्रवेशासाठी पोशाखाची नियमावली
– पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा.
– शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा.
– महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा.
– मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे.
– कोणीही अति आधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये.
हेही वाचा:





