Sanya Malhotra : स्वप्न साकार! दंगल फेम अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर; चाहत्यांना दाखवली पहिली झलक
Sanya Malhotra : मुंबईत अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने स्वतःचं हक्काचं नवीन घर खरेदी केली असल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Sanya Malhotra : प्रत्येक कलाकाराचं आपलं मुंबईत हक्काच घर असावं असं स्वप्न असतं. अनेक जण आपल्या मेहनतीने आणि परिश्रमानं हे स्वप्न साकार करतात. दंगल गर्ल सान्या मल्होत्रा या अभिनेत्रीने हे स्वप्न पूर्ण केले आहे. तिने मुंबईत आपल्या हक्काचे घर विकत घेतले आहे. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी तिने मुंबईत घर खरेदी केले आहे.
नवीन घराची पहिली झलक तिने चाहत्यांसाठी सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. नवीन घराच्या फोटोंसोबत तिने खास नोट शेअर केली आहे. चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. या आलिशान घराची किंमत 14.3 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : Threat to the Badshah : पंजाबी गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी;लॉरेन्स बिश्नोई टोळी पुन्हा कार्यरत
बॉलिवूडच्या दंगल चित्रपटातून सान्याने एन्ट्री केली. तिने बबीता फोगाटची भूमिका साकारली होती. नंतर तिने अनेक चित्रपटांमधून अभिनय कौशल्य दाखवत प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवली.
अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर सान्याने मुंबईत खर खरेदीचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद पोस्टमधून व्यक्त केला आहे. ती म्हणाली,” हर हर महादेव ,कित्येक वर्षांची स्वप्नं, मेहनत, शिकणं आणि स्वतःला घडवण्याचा प्रवास…या घराची प्रत्येक भिंत मला नेहमी आठवण करून देईल की संयम आणि विश्वास याचं फळ किती सुंदर असू शकतं. या संपूर्ण प्रवासात माझ्या कुटुंबाचा आणि मित्रांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद होती. हे फक्त एक घर नाही…हा माझ्या प्रवासाचा एक छोटासा, पण खूप खास भाग आहे. माझ्या घरी तुमचं स्वागत.
सान्या मल्होत्राच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तसेच तिच्या सहकलाकार आणि अनेक सेलिब्रेटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हे नवीन घर अतिशय प्रशस्त असून तिच्या घरातून समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं.





