Actress Kriti Kharbanda : अभिनेत्री क्रिती खरंबदा हिने शादी में जरूर आना या चित्रपटातून बॅालिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटाने तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असायची, पण अलीकडे ती चित्रपट आणि सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. अशातच तिने इंन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली आहे. पती पुलकित सम्राटसोबत लग्नाची दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनेत्री क्रिती खरबंदाने 10 खास फोटो इंन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. त्यांच्या आयुष्यातील सुंदर क्षण टिपणारे हे फोटो आहेत. प्रत्येक फोटोला क्रितीने आकर्षक कॅप्शन दिले आहे. हेही वाचा : IRGC on Benjamin Netanyahu: “नेतन्याहू जिवंत असतील तर आम्ही त्यांना शोधून मारू” ; पीएमओच्या निवेदनावर आयआरजीसीची धमकी या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक फोटोमधून तिने खास कॅप्शनमधून पती पुलीकतबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. क्रिती आणि पुलकितबद्दल पोस्टच्या शेवटी क्रितीने लिहिले, “आम्हाला दोघांनाही २ वर्षांच्या शुभेच्छा.” क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांनी पागलपंती या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता. काही महिन्यांच्या मैत्रीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर क्रिती आणि पुलकितने मार्च 2024 मध्ये लग्न केले. क्रितीने तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात मॅाडेलिंगपासून केली. 2009 मध्ये तिने बोनी या चित्रपटातून तेलुगू चित्रपटात पदार्पण केले. बॅालिवूडमध्ये तिच्या “शादी में जरूर आना”, “हाऊसफुल 4” आणि “गेस्ट इन लंडन” या सारख्या चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या. हेही वाचा : Sanjay Jha: “आम्ही राज्यसभा निवडणूक जिंकू,” ; बिहार भाजप बैठकीनंतर ‘या’ मंत्र्यांचा दावा