Sanya Malhotra : ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्राच्या लव्ह लाईफला ब्रेक? ऋषभसोबत ब्रेकअपच्या चर्चांना उधाण
Sanya Malhotra : ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे लाइमलाइटमध्ये आली आहे.

Sanya Malhotra : ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने मुंबईत आलिशान घर खरेदी केल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता ब्रेकअपच्या चर्चांमुळे सान्या लाइमलाइटमध्ये आली आहे.
गेल्या वर्षभरापासून सान्या ही प्रसिद्ध सितारवादक ऋषभ रिखिरम शर्मा याला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता या दोघांनी आपले मार्ग वेगळे केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याने ब्रेकअपच्या चर्चांना अधिक जोर आला आहे.
मात्र, सान्या आणि ऋषभ यांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीही अधिकृत घोषणा केली नव्हती. ते दोघेही आपले वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवत होते. काहीवेळा ते एकत्र दिसले असले तरी त्यांनी कधीही खुलेपणाने आपले नाते मान्य केले नव्हते.
अलीकडे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा जोर धरत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले असून, दोघेही आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. इतकेच नव्हे तर ऋषभ नव्या नात्यात असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. मात्र, या सर्व बाबींवर दोघांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
सान्या आणि ऋषभ यांच्या नात्याच्या चर्चा 2025 पासून सुरू झाल्या होत्या. अनेकदा दोघे एकाच ठिकाणी स्पॅाट झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर एका कार्यक्रमातही दोघे एकत्र दिसल्याने त्यांच्या अफेअरच्या चर्चांना अधिक उधाण आले होते.
सान्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या सिनेमात झळकली होती. लवकरच ती ‘टोस्टर’ या सिनेमात अभिनेता राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. हा सिनेमा 15 एप्रिलपासून नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे.





