ड्रॅगनचा आता भूतानला विळखा

नवी दिल्ली : भारताच्या गलवान खोऱ्यावर हक्क सांगितल्यानंतर आणि नेपाळच्या भूभागाचा लचका तोडल्यानंतर विस्तारवादी चीनने आपली नजर भूतानच्या अरूणाचल प्रदेशशी जोडल्या गेलेल्या भूभागावर वळवली आहे. हा भाग बळकावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याने भारताच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
जागतिक पर्यावरण सुविधा परिषदेच्या व्यासपीठावर चीनने हा हक्क सांगितला आहे. भूतानच्या साकतेंग वन्यजीव अभयारण्याला मदत करण्यास हा “वादग्रस्त’ आक्षेप नोंदवला आहे. चीनचा आक्षेप भूतानने तातडीने फेटाळून लावला आहे. साकतेंग हा भुतानचा अंतर्गत आणि सार्वभौम भाग असल्याचे भूतानने स्पष्ट केले आहे. भूतान आणि चीन दरम्यान या प्रदेशातील सीमावादाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
चीनची ही भूमिका त्यांच्या विस्तारवादी पर्वाची निशाणी समजली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विस्तारवादी युग संपले असे ठणकावल्याच्या दुसऱ्या दिवशीच चीनने हा दावा केला आहे.
सातकेंग हा चीन आणि अरुणाचलप्रद्रश यांच्या सीमांमधील प्रदेश आहे. हा त्यांचा दावा हा भारताला डिवचण्यासाठी असल्याचे राजनैतिक क्षेत्रात मानले जात आहे.
चीनने नेपाळचा भूभाग बळकावण्यासाठी तिबेटमध्ये रस्ते बांधणीच्या काम वेगात सुरू केले आहेत. त्यासाठी बळकावलेला प्रदेश चीनशी राजनैतिक स्तरावर चर्चा करून परत मिळवावा अशी मागणी नेपाळ कॉंग्रेसने गेल्या महिन्यात केली होती. डोलखा. हुमला, सिंधपालचौक, गोरखा आणि रसुवा या जिल्ह्याती 64 हेक्टर जमीन चीनने बळकावली आहे.
अलीकडेच, तिबेटचे निष्कासीत राष्ट्राध्यक्ष लोकसंग संगय म्हणाले, हिमालयीन राष्ट्रांना गिळंकृत करण्याच्या चीनच्या पाच कलमी कार्यक्रम त्यांच्या आक्रमणाने स्पष्ट होत आहे. त्यांनी साठच्या दशकात तिबेट गिळंकृत केले. आता लडाख, नेपाळ. भूतान, सिक्कीम आणि अरूणाचल प्रद्रश बळकावायचे आहे.
करोना प्रदेश बळकावण्यासाठी
सारे जग करोनाशी लढण्यात गुंतले असताना चीन मात्र हिमालयीन राष्ट्रे दक्षिण चीन समुद्र बळाकावण्यात गुंतला आहे. शी जिनपींग यांनी यासाठीच हा विषाणू तयार केला असावा अशी शक्यता सामरिक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.





