डाॅ.रावसाहेब कसबे यांना वाग्यज्ञे साहित्य तर दिलीप प्रभावळकर यांना वाग्यज्ञे कला गौरव पुरस्कार जाहीर

पुणेः- साहित्यीक कलावंत प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने दिले जाणारे वाग्यज्ञे साहित्य आणि
कलागौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डाॅ.रावसाहेब कसबे यांना मराठी साहित्यातल्या भरीव योगदानाबद्दल वाग्यज्ञे साहित्य गौरव पुरस्काराने तर मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीत दिलेल्या उल्लेखनीय आणि भरीव योगदानाबद्दल सुप्रसिद्ध कलावंत दिलीप प्रभावळकर यांना वाग्यज्ञे कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.साहित्यीक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आणि सचिव वि.दा.पिंगळे यांनी आज ही माहिती प्रसिद्ध पत्रकाद्वारे
कळविली आहे.
21 साव्या साहित्यीक कलावंत संमेलनात रविवार दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता डाॅ. न.म.जोशी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. रोख रक्कम 11 हजार, सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्काराचे स्वरुप आहे.
डाॅ.रावसाहेब कसबे यांनी विविध विषयांवर विपूल लेखन केलेले आहे. यांची स्त्रोत मानव आणि धर्मचिंतन, सम्यक परिवर्तन, गांधी पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा ही काही गाजलेली पुस्तके आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. सुप्रसिद्ध कलावंत दिलीप प्रभावळकर यांनी विविध मराठी, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांत तसेच नाटकांत प्रमुख भूमिका केलेल्या आहेत. एक डाव भुताचा, चौकट राजा, झपाटलेला, सरकारनामा, लगे रहो मुन्नाभाई हे त्यांचे काही चित्रपट लोकप्रिय आहेत. अलबत्या गलबत्या, आरण्यक, घर तिघांचे हव, बटाट्याची चाळ, हसवा-फसवी ही काही प्रसिद्ध नाटके आहेत.




