सचिन पिळगांवकर तुम्हाला सिनिअर आहेत का? दिलीप प्रभावळकरांचं उत्तर ऐकून सगळेच शॉक ! काय म्हणाले पाहा….

Dashavatar Movie Trailer : कोकणातील दशावतार या परंपरेवर आधारित गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होत असलेल्या ‘दशावतार’ या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासून सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. १२ सप्टेंबर रोजी ‘दशावतार’ थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद या सिनेमाला मिळत आहे.
झी स्टुडिओजने या सिनेमाची प्रस्तुती केली असून, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसने या सिनेमाची निर्मिती केली आहे. दरम्यान, या सिनेमाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी दिलेल्या मुलाखतींमधून दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलूही उलगडत आहेत.
दिलीप प्रभावळकर यांनी वयाची ऐंशी पार केली आहे. मात्र अजूनही ते तितकेच फिट दिसतात. एक सो एक हिट सिनेमे त्यांनी सिनेसृष्टीला दिले. नुकतंच त्यांनी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून, यावेळी त्यांना अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता.
“सचिन पिळगांवकर तुम्हाला सिनिअर आहेत का?” या प्रश्नावर दिलीप प्रभावळकर यांनी जे उत्तर दिले, ते खूपच प्रामाणिक आणि नम्रहोतं. ते म्हणाले, “हो! सचिन पिळगांवकर मला सिनिअर आहेत.” असे ऐकल्यानंतर सगळेच चकीत झाले आणि हसू लागले.
दिलीप प्रभावळकर यांनी त्याचे कारणही सांगितले ते म्हणाले, “मी खूप उशिरा काम करायला सुरुवात केली. मला या क्षेत्रात येऊन साधारण ५० वर्षे झाली आहेत. पण, सचिन पिळगांवकर यांनी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून अगदी लहानपणापासूनच काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अभिनयाच्या बाबतीत ते माझ्यापेक्षा सिनिअरच आहेत.” असे ते म्हणाले.
‘दशावतार’ची बॉक्स ऑफिसवर चलती…
‘दशावतार’ने पहिल्या दिवशी ५८ लाख रुपयांचा व्यवसाय केला. पण, दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शनिवारी, या कमाईने थेट कोटींचा टप्पा पार केला. चित्रपटाने १.३९ कोटी रुपये कमावले आहेत, ज्यामुळे फक्त दोन दिवसांतच जगभरात चित्रपटाची कमाई २.२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.





