Aditya Thackeray : याला म्हणतात संस्कार! आदित्य ठाकरेंची कृती सर्वांनाच भावली; नेटकऱ्यांकडून कौतुक, Video पाहा…

Aditya Thackeray : आज महाराष्ट्रात बहुप्रतिक्षेत दशावतार हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. या सिनेमाचं काल स्पेशिल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला मराठी इंडस्ट्रीसह काही राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. विशेष म्हणजे शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.
या स्पेशल स्क्रिनिंगला आदित्य ठाकरे काळ्या रंगाचा शर्ट आमि डेनिम लुकमध्ये पोहचले. त्यांच्या लुकीच चर्चा होत असतानाच त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे नेटकरी त्यांच कौतुक करत आहेत. दशावतार सिनेमातले मुख्य ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना पाहाताच आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. त्यांच्या या कृतीचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या स्पेशल स्क्रिनिंगला भाजप नेते विनोद तावडे यांनी देखील हजेरी लावली होती.
आपल्या मातीतली गोष्ट आणि जागतिक दर्जाची चित्रभाषा ह्यांचा संगम असलेला, local to global चं सार्थ उदाहरण असलेला, ‘दशावतार’ हा भव्य सिनेमा आजपासून सिनेमागृहात येतोय. प्रत्येकाने सिनेमागृहात जाऊन हा अनुभव घ्यायला हवा.
‘दशावतार’ च्या टिमला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/8LZIxBFzsA— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 12, 2025
आदित्य ठाकरेंनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. त्यांनी या सिनेमाला पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या मातीतली गोष्ट आणि जागतिक दर्जाची चित्रभाषा ह्यांचा संगम असलेला, local to global चं सार्थ उदाहरण असलेला, ‘दशावतार’ हा भव्य सिनेमा आजपासून सिनेमागृहात येतोय. प्रत्येकाने सिनेमागृहात जाऊन हा अनुभव घ्यायला हवा. ‘दशावतार’ च्या टिमला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा! असं आदित्य ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
View this post on Instagram
दशावतार या सिनेमात कलाकारांची मोठी फौज आहे. दिलीप प्रभावळकर हे सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तर महेश मांजरेकर, भरत जाधव यांच्याही खास भूमिका आहेत. तसेच आघाडीचे तरुण कलाकार सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर हे देखील आहेत. तसंच विजय केंकरे, रवी काळे यांसारखे दिग्गज कलाकार या सिनेमात विशेष भूमिकेत आहेत.
हेही वाचा : उपराष्ट्रपतींच्या शपथविधी समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती; शिंदेंनी सांगितलं कारण म्हणाले…





