डॉ. नायडू रुग्णालयाची रुग्णक्षमता संपली
Updated On:

पुणे – शहरात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने आपसूकच महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाची रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे 35 करोनाचे बाधित रुग्णांना लवळे येथील सिम्बॉयसिस रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
शहरात करोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून, नायडू रुग्णालयात 121 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, नायडू रुग्णालयाची क्षमता केवळ 100 बेड्सची आहे. त्यामुळे येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. तसेच रुग्णांना उपचार देताना दमछाक होत आहे. मात्र, नायडू रुग्णालयात अचानक रुग्ण संख्या वाढल्यावर त्यांना कोठे दाखल करायचे, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. दरम्यान, लवळे येथील सिम्बॉयसिस रुग्णालयात 500 बेड्सची सुविधा उपलब्ध आहे, असे प्रशासनाने सांगितले.





