Dev Choudhary Selection : डीपीएल 2026 मध्ये खळबळ! देव चौधरीच्या निवडीवरून राडा; विराटचे बालपणीचे प्रशिक्षक वादाच्या भोवऱ्यात
Dev Choudhary Selection : डीपीएल २०२६ मधील देव चौधरीच्या निवडीवरून क्रिकेट वर्तुळात प्रचंड गदारोळ माजला आहे.

DPL 2026 Controversy Dev Choudhary Selection Video Viral New Delhi Tigers Coach : दिल्ली प्रीमियर लीग २०२६ (DPL 2026) मध्ये न्यू दिल्ली टायगर्स संघाचा खेळाडू देव चौधरीच्या (Dev Choudhary) निवडीवरून क्रिकेट वर्तुळात प्रचंड गदारोळ माजला आहे. मैदानावरील त्याच्या अतिशय सुमार फलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अव्वल दर्जाच्या स्थानिक टी-२० लीगमध्ये इतक्या सुमार दर्जाच्या खेळाडूला थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी कशी मिळाली, यावरून आता लीग प्रशासनासह दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटना (DDCA) संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्यावरही उठले प्रश्न!
या संपूर्ण वादात न्यू दिल्ली टायगर्सचे मुख्य प्रशिक्षक आणि विराट कोहलीचे बालपणीचे मार्गदर्शक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांच्यावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एवढ्या मोठ्या क्रिकेट तज्ज्ञाच्या उपस्थितीत अशा अयोग्य खेळाडूची निवड कशी झाली, असा जाब विचारला जात असून शर्मा यांनी अद्याप यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. याशिवाय अंडर-१९ विश्वचषक विजेता माजी वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवाननेच (Pradeep Sangwan) देव चौधरीच्या नावाची शिफारस केल्याचा दावा केला जात आहे.
‘मुलाला पाठवू नका, तो चांगला खेळत नाही!’; क्लब अधिकाऱ्याचा मोठा खुलासा
This fraud Dev Chaudhary can’t even hold bat properly but he is still playing in Delhi premier league 😭🤣
– look at the non striker reaction 😂😭 pic.twitter.com/qyj1UKi0bm
— JB (@93Yorker) August 25, 2026
पीटीआयने (PTI) दिलेल्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ क्लब अधिकाऱ्याने धक्कादायक माहिती दिली आहे. “प्रदीप सांगवानच्या शिफारसीवरून देवने आमच्या क्लबसाठी दोन सामने खेळले होते. मात्र, त्याची खराब कामगिरी पाहून आमच्या अधिकाऱ्यांनी थेट त्याच्या वडिलांना फोन करून ‘तुमच्या मुलाला पाठवू नका, तो खेळण्यासाठी योग्य नाही’ असे स्पष्ट सांगितले होते. त्यानंतर तो क्लबमध्ये परतला नाही; पण थेट डीपीएलच्या मुख्य संघात झळकला,” असा गौप्यस्फोट सूत्रांनी केला आहे.
२ सामन्यांत अवघ्या १६ धावा; न्यू दिल्ली टायगर्सची लाजिरवाणी कामगिरी!
He Is Dev Chaudhry son of a big businessman in Delhi. Just look at his running and catching technique here. He doesn’t even seem to know how to run properly, yet he is selected and playing in the Delhi Premier League 🤦♂️
Meanwhile, so many genuinely talented players go to waste… pic.twitter.com/F7t52h8d07
— ElysiumCricket (@CricketElysium) August 25, 2026
देव चौधरीच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, त्याने लीगमध्ये खेळलेल्या दोन सामन्यांत एका सामन्यात शून्य (Duck), तर दुसऱ्या सामन्यात २४ चेंडूंत अवघ्या १६ धावा केल्या. न्यू दिल्ली टायगर्सचा संघ या स्पर्धेत १० सामन्यांत केवळ १ विजय मिळवून गुणतालिकेत तळाच्या स्थानावर राहिला आहे. देव चौधरीच्या व्हायरल व्हिडीओंमुळे स्थानिक क्रिकेटमधील वशिला आणि पारदर्शकतेवर पुन्हा एकदा काळे ढग जमा झाले आहेत.





