“कबुतर हा पक्षी कुठल्या एका धर्माचा…”; दादरमधील कबुतरखान्यावरील कारवाईनंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट

Mumbai Dadar Kabutar Khana | मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे नागरिकांना श्वसनासंबंधित आजारांचा त्रास होत असल्याने ही मागणी करण्यात आली होती. यानंतर मुंबई महानगरपालिकेने दादरमधील कबुतरखान्यावर कारवाई केली. या कारवाईच्या निषेधार्थ रविवारी जैन समाजाने ‘शांतीदूत यात्रा’ काढून शांततेच्या मार्गाने आपला विरोध नोंदवला. यावर आता अभिनेता अभिजीत केळकर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिजीत केळकरची पोस्ट
काहीच दिवसांपूर्वी दादरच्या कबूतरखान्याचा हा व्हिडिओ, शूट करतानाच माझा भयंकर संताप झाला होता. भूतदया वगैरे सगळं मलाही आहेच, मलाही प्राणी, पक्षी अतिशय प्रिय आहेत पण कबूतर ह्या पक्षांमुळे श्वसनाचे बरे न होणारे गंभीर विकार, आजार होतात हे सिद्ध होऊनही, मुंबई महानगरपालिकेने वारंवार सूचना देऊनही लोकांना अक्कल येत नाही, असे अभिजीत केळकरने पोस्टमध्ये म्हंटले आहे.
View this post on Instagram
कबुतर हा पक्षी कुठल्या एका धर्माचा त्यांना वाटत असेल तर तो त्यांनी आपल्या घराला जाळ्या लावून, घराच्या आत खुशाल पाळावा. आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कुठल्याही पक्षाने, निदान ह्याचे तरी धार्मिक राजकारण न करता, @my_bmc @mybmchealth ने जी ताडपत्री, शेड घालून, कारवाई केली आहे त्यामागे खंबीरपणे उभे रहावे ही कळकळीची विनंती, असेही त्याने म्हंटले आहे. Mumbai Dadar Kabutar Khana |
दरम्यान, कबुतरखाने बंद करण्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहीत जनतेच्या भावना विचारात घेऊन या विषयावर तोडगा काढावा, असं आवाहन केलं आहे. Mumbai Dadar Kabutar Khana |
500 रुपये दंड आणि गुन्हा दाखल
कबुतरखान्याच्या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकल्यास 500 रुपये दंड आणि गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आला होता. मात्र, काही नागरिक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. तर काही स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या या कारवाईला विरोध केला आहे. Mumbai Dadar Kabutar Khana |
हेही वाचा :





