अभिजीत केळकर भातलावणीसाठी पोहोचला कोकणात; म्हणाला, ‘अन्नाचा प्रत्येक कण पिकवण्यासाठी…’

Abhijeet Kelkar | अभिनेता अभिजीत केळकर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच त्याने शेतातील भातलावणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या ती कोकणात भातलावणीसाठी पोहोचला आहे.
अभिजीत गेल्या वर्षीही कोकणात भातलावणीसाठी गेला होता. अशातच त्याचा यंदाचा भातलावणीचा व्हिडीओही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत हातात नांगर घेत बैलांच्या साथीने चिखलात नांगरणी करत आहे. तसंच हातात भाताची रोपं घेत तो चिखलात त्याची लावणी करत आहे.
या व्हिडीओमधून अभिजीतने त्याचा हा भातलावणीचा अनुभवही शेअर करत म्हंटले की, “खाऊन माजा, टाकून माजू नका असं माझी आजी म्हणायची. तेच मी माझ्या मुलांना सांगत असतो. अन्नाचा प्रत्येक कण पिकवण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे माझ्या आजीला माहीत होतं. त्यामुळे ती नेहमीच सांगायची की, अन्नाचा आदर करा. खाऊन माजा पण टाकून माजू नका.” Abhijeet Kelkar |
View this post on Instagram
यानंतर त्याने म्हटलं की, “शेतीचे कष्ट काय असतात हे अनुभवण्यासाठी गेल्या वर्षीही आलो होतो आणि यावर्षी पुन्हा आलो आहे. हा अनुभव शब्दांत सांगता येण्यासारखा नाही. हा अनुभव अवर्णनीय आहे. खूप मज्जा येत आहे.” याशिवाय हा व्हिडीओ शेअर करत अभिजीतने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘कोकणात जन्म घ्यायला आणि यायला नशीब असावं लागतं’ असं लिहिले आहे. Abhijeet Kelkar |
अभिजीतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या साधपणाचे कौतुक केले आहे.
हेही वाचा:





