‘माझा पाठलाग करु नका…’; आमिर खानची गर्लफ्रेंड पापाराझींवर संतापली

Aamir Khan Girlfriend Gauri | अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आल आहे. आमिरने गर्लफ्रेंड गौरी स्प्राट हिच्यासोबतचे नाते जाहीर केल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. यातच आता गौरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात फोटोग्राफर्सनी तिचा पाठलाग केल्यामुळे ती संतापल्याचे पाहायला मिळाले.
व्हायरल व्हिडीओमध्ये गौरी स्प्राट एका ठिकाणाहून बाहेर पडताना दिसत आहे. त्यावेळी अनेक फोटोग्राफर्स तिचा पाठलाग करत तिचे फोटो क्लिक करू लागतात. यामुळे ती खूप अस्वस्थ आणि नाराज झाल्याचे दिसत आहे. ”तुम्ही सगळे येता कुठून? माझा पाठलाग करु नका, मला एकटं सोडा”, अशा शब्दात तिने पापाराझींना चांगलंच सुनावलं. Aamir Khan Girlfriend Gauri |
गौरीच्या या व्हिडीओनंतर नेटिझन्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी गौरीला सेलिब्रेटी नसल्यामुळे तिची प्रायव्हसी जपण्याचा सल्ला फोटोग्राफर्सना दिला आहे. तर काहींनी ‘जेव्हा तुम्ही आमिर खानसोबत असता, तेव्हा हे सर्व होणारच,’ असे म्हटले आहे.
View this post on Instagram
;
आमिर खान आणि गौरी स्प्राट यांनी काही महिन्यांपूर्वी एकमेकांच्या नात्याची जाहीर कबूली दिली. गौरी ही आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करते आणि अनेकदा ती आमिरसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. Aamir Khan Girlfriend Gauri |
आमिर खान लवकरच ‘लाहौर 1947’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्या सोबत सनी देओल झळकला आहे. याशिवाय अलीकडेच तो आर्यन खानचा ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये पाहायला मिळाला. त्याआधी तो ‘सितारे जमीन पर’ आणि ‘कुली’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. Aamir Khan Girlfriend Gauri |
हेही वाचा :
एकादशीनिमित्त गर्दी अन् घडला अनर्थ! वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीत ९ भाविकांचा मृत्यू





