“तुम्ही हिंमत कशी केली?” काजोलचा व्हिडिओ पाहून बॉलीवूड अभिनेत्रीने पापाराझींना सुनावले

Kajol Viral Video | बॉलीवूड अभिनेत्री काजोलने अलीकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यानचे तिचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पापाराझीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने टाईट काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. यावरून काहींनी ती गरोदर असल्याची टिप्पणी केली आहे. तसेच काहींनी बॉडी शेमिंगही केले आहे. याप्रकरणी मिनी माथूरने पापाराझीवर संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री मिनी माथूरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, “तुम्ही तिच्या शरीरावर झूम इन करण्याची हिंमत कशी केली? ती कशी दिसावी हे ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही.” तिच्या या विधानाचे अनेकांनी समर्थन केले आहे. ‘कोणत्याही महिलेच्या शरीराबाबत अशा प्रकारे बोलणे चुकीचे आहे,’ अशी कमेंट एका युझरने केली आहे. Kajol Viral Video |
View this post on Instagram
काजोल लवकरच ‘द ट्रायल: प्यार कानून धोखा’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. यामध्ये ती पुन्हा नोयोनिका सेनगुप्ताची भूमिका साकारणार आहे. या नव्या सीझनमध्ये तिची भूमिका वैयक्तिक अडचणी आणि व्यावसायिक आव्हानांना झुंज देताना दिसणार आहे. Kajol Viral Video |
हेही वाचा :





