एकादशीनिमित्त गर्दी अन् घडला अनर्थ! वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीत ९ भाविकांचा मृत्यू

Venkateswara Swamy Temple Stampede | आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील ऐतिहासिक श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एकादशीनिमित्त भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, काही लोक जखमी झाले आहेत.
एकादशीमुळे पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी आत प्रवेश मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली, ज्यामुळे अचानक चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यात अनेक भाविक खाली कोसळले आणि गर्दीच्या रेट्यात चिरडले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Andhra Pradesh CM Chandrababu Naidu tweets, “The stampede incident at the Venkateswara Temple in Kasibugga in Srikakulam district has caused a shock. The death of devotees in this tragic incident is extremely heartbreaking… I have instructed the officials to provide speedy and… https://t.co/SSHk4CGOnO pic.twitter.com/UdbrlEKKZ1
— ANI (@ANI) November 1, 2025
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू प्रतिक्रिया
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबाबत बोलताना सांगितलं की, ‘ श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील वेंकटेश्वर मंदिरात झालेली चेंगराचेंगरी ही अतिशय दुःखद घटना आहे. या दुःखद घटनेत झालेले जीवितहानी हृदयद्रावक आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. तसंच त्यांनी जखमींना त्वरित आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसंच स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदत कार्यावर देखरेख करण्याचीही विनंती केली आहे.’ Venkateswara Swamy Temple Stampede |
दरम्यान, प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवले असून, परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे आणि मंदिर व्यवस्थापनाच्या नियोजन आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. Venkateswara Swamy Temple Stampede |
हेही वाचा :





