‘लवकरच भारतासोबत…’ ; अमेरिका- चीनमध्ये मोठा व्यापार करार झाल्यानंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा

Donald Trump trade deal । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि चीनमधील व्यापार कराराबद्दल मोठी घोषणा केली. यामुळे चीन आणि अमेरिकेतील जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्प यांनी भारताबद्दलही प्रतिक्रिया दिली. त्यांनी,”भारतासोबतही एक खूप मोठा व्यापार करार होणार आहे” असे म्हटले आहे. ट्रम्प त्यांच्या काही निर्णयांमुळे सध्या चर्चेत आहेत. इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर ते आता व्यापारावर लक्ष केंद्रित करत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच ‘बिग ब्युटीफुल बिल’ कार्यक्रमात भाग घेतला. या दरम्यान ते म्हणाले, “प्रत्येकजण आमच्यासोबत व्यवसाय करू इच्छितो. काही महिन्यांपूर्वी मीडिया विचारत होता की कोणी खरोखर व्यापार करारात रस दाखवेल का? आम्ही कालच चीनसोबत करार केला आहे. आम्ही आणखी चांगले करार करू. भारतासोबतही करार करता येईल.”
“अमेरिका सर्वांशी करार करणार नाही” Donald Trump trade deal ।
ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केले की अमेरिका फक्त काही देशांसोबत व्यापार करार करेल. याविषयी त्यांनी, “सर्वांशी करार होणार नाही” आहे देखील यावेळी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की,”आम्ही सर्वांना धन्यवाद देणारे पत्र पाठवू आणि त्यांना २५, ३५ किंवा ४५ टक्के रक्कम देण्यास सांगू. हा एक सोपा मार्ग असेल.”
भारत आणि अमेरिकेत लवकरच व्यापार करार होणार ? Donald Trump trade deal ।
भारत आणि अमेरिकेत लवकरच व्यापार करार होऊ शकतो. दोन्ही देश ९ जुलैपूर्वी कराराला अंतिम स्वरूप देऊ शकतात. अमेरिकेने भारतातून येणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के कर लावण्याची घोषणा केली होती. त्याच वेळी, भारताची इच्छा आहे की २६ टक्के कर मागे घ्यावा. ट्रम्पच्या कर निर्णयावर बराच गदारोळ झाला. त्यांनी चीनवरही कर लावला होता. याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवर कर लावला.





