Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताविषयीच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावरून यु-टर्न
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या एका कृतीने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध रेडिओ होस्ट मायकेल सॅव्हेज यांचे एक पॉडकास्ट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या एका कृतीने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध रेडिओ होस्ट मायकेल सॅव्हेज यांचे एक पॉडकास्ट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या पॉडकास्टमध्ये भारत, चीन आणि इतर काही देशांचा उल्लेख नरक (Hell-holes) असा करत अत्यंत आक्षेपार्ह आणि वर्णद्वेषी टिप्पणी केली. मात्र, काही वेळातच त्यांनी (Donald Trump) यु-टर्न घेत सारवासारव केली.
अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने म्हटले की, भारत हा एक महान देश आहे. या देशाचे नेतृत्त्व माझा एक अत्यंत चांगला मित्र करत आहे, असे नमूद केले. मात्र, ट्रम्प (Donald Trump) यांनी हे विधान नेमके कुठे आणि कधी केले याचा प्रवक्त्याने स्पष्ट उल्लेख केला नाही.
तत्पूर्वी, मायकेल सॅव्हेज यांनी आपल्या सॅव्हेज नेशन या कार्यक्रमात दावा केला की, भारत आणि चीनमधील लोक केवळ मुलाला जन्म देण्यासाठी अमेरिकेत येतात. अमेरिकेच्या सध्याच्या कायद्यानुसार, तिथे जन्मलेले बाळ तात्काळ अमेरिकन नागरिक बनते. सॅव्हेज यांनी या स्थलांतरितांचा उल्लेख लॅपटॉप घेऊन फिरणारे गँगस्टर असा केला.
तसेच त्यांनी अमेरिकेचा अपमान केल्याचा आरोपही केला आहे. या लोकांनी माफिया कुटुंबांपेक्षाही जास्त नुकसान अमेरिकेचे केले आहे, असे अजब तर्क सॅव्हेज यांनी या पत्रात मांडले आहेत. सॅव्हेज यांनी केवळ देशाचाच अपमान केला नाही, तर भारतीय स्थलांतरितांवरही निशाणा साधला आहे. कॅलिफोर्नियातील हाय-टेक कंपन्यांमध्ये आता पांढऱ्या व्यक्तीला नोकरी मिळणे अशक्य झाले आहे.
कारण तिथली सर्व यंत्रणा आता भारतीय आणि चिनी लोक चालवत आहेत, असे म्हणत त्यांनी नोकऱ्यांच्या मुद्द्यावरून विषारी टीका केली आहे. ट्रम्प (Donald Trump) यांनी ही वर्णद्वेषी पोस्ट त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याने याला अधिकृत पाठबळ मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.






