Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला कडक इशारा दिला असून, येत्या बुधवारापर्यंत दोन्ही देशांमध्ये कोणताही करार झाला नाही, तर इराणवर थेट हल्ला करण्याची धमकी दिली आहे. सध्या सुरू असलेली दोन आठवड्यांच्या युद्धविरामाला मुदतवाढ देण्यासही त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. सीएनबीसीच्या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प (Donald Trump) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ट्रम्प म्हणाले, शांतता चर्चेसाठी वेळ मिळावा म्हणून तुम्ही शस्त्रसंधी वाढवणार का? इराणला चर्चेसाठी पुढाकार घ्यावाच लागेल. जर त्यांनी करार केला, तर ते पुन्हा एकदा एक सामर्थ्यशाली आणि उत्तम राष्ट्र बनू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. Donald Trump तसेच बुधवारी शस्त्रसंधी संपल्यानंतर जर कोणताही समझोता झाला नाही, तर पुन्हा हल्ले करण्यास आम्ही सज्ज आहोत. हल्ल्याचा पवित्रा घेऊन चर्चा करणे जास्त प्रभावी ठरते, असे त्यांनी नमूद केले. इराणच्या नौदल आणि हवाई दलाला आम्ही आधीच उद्ध्वस्त केले आहे. तसेच त्यांचे नेतृत्वही संपुष्टात आणले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाही. हे एक प्रकारे सत्तांतर आहे. मी असे करणार असल्याचे कधी म्हटले नव्हते, पण मी ते अप्रत्यक्षपणे करून दाखवले आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची पहिली फेरी ११ आणि १२ एप्रिल रोजी पार पडली होती. परंतु त्यातून कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही. आता होणाऱ्या दुसऱ्या फेरीबद्दल अद्याप अनिश्चितता कायम आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेल्या धमकीमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.