Walmik Karad Arrest : वाल्मिकला पोसण्याची गरज काय? शिंदेसेनेच्या माझी खासदाराचं वक्तव्य चर्चेत !

बीड – बीड हत्या प्रकरणावरून महायुतीत असलेला बेबनाव पुन्हा एकदा समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमदार सुरेश धस सातत्याने हे प्रकरण लावून धरत असून अनेक दावे, आरोप करताना पाहायला मिळत आहेत. यासह विरोधकही महायुती सरकारवर हल्लाबोल करत आहेत.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तिकरही यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. वाल्मिक कराड हा गुंड धनंजय मुंडे यांना पोसण्याची गरज काय? असा सवाल गजानन कीर्तिकर यांनी केला. यावरून आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींपैकी फरार असलेल्या दोघांना २५ दिवसांनी अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून शिवसेना संघटना बांधण्याचे काम मराठवाड्यात करत होतो. सर्व जिल्ह्यातील जवळपास साडेसहाशे गावांत माझा संचार झाला.
तिथे असलेले जनजीवन जवळून पाहिले. १९९५ मध्ये भाजपा नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गृहराज्यमंत्री म्हणून काम केले. त्यांची काम करण्याची पद्धत आणि वैचारिक बैठक मजबूत होती. ते गृहमंत्री होते, मनात आणले असते, तर दहा वाल्मिक कराड उभे करू शकले असते.
मात्र, तशी त्यांची विचारधारा नव्हती. परंतु, आता मोठा वैचारिक बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराड हा गुंड धनंजय मुंडे यांना पोसण्याची गरज काय? असा सवाल गजानन कीर्तिकर यांनी केला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा खास माणूस आहे. गुंड पोसून राजकारणात मोठे होता येते, पण ते फार काळ टिकत नाही, अशी टीकाही गजानन कीर्तिकर यांनी केली.





