“पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?”; जयंत पाटलांचा सवाल

Vanraj Andekar Pune Crime | राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. मात्र खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री नाना पेठेत ही घटना घडली.
आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्याात येत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल केला आहे. Vanraj Andekar Pune Crime |
जयंत पाटील यांचे ट्वीट
जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हंटले की, “पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे देशभर बदनाम होऊ लागले आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?”
पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 2, 2024
नेमकं काय घडलं?
वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. तसेच धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट पसरली आहे. Vanraj Andekar Pune Crime |
कोण आहे वनराज आंदेकर ?
पुणे महापालिकेच्या २०१७ मध्ये वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या २००७ आणि २०१२ या दोन वेळा नगरसेविका होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर देखील नगरसेवक होते.
हेही वाचा:
कंगना राणावतचा जया बच्चन यांच्यावर हल्लाबोल ; म्हणाल्या,”त्यांना पॅनिक अटॅक…”





