कंगना राणावतचा जया बच्चन यांच्यावर हल्लाबोल ; म्हणाल्या,”त्यांना पॅनिक अटॅक…”

Kangana On Jaya Bachchan । अभिनेत्री कंगना राणावत ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती तुच्या ‘एमर्जन्सी’ या चित्रपटामुळे वादात अडकली आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान , कंगणाने आता ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनात जया बच्चन अलीकडे संसदेत खूप चर्चेत होत्या. राज्यसभेच्या सभापतींनी जया यांच्या नावासोबत पती अमिताभ बच्चन यांचे नाव जोडल्याने त्या संतप्त झालेल्या. या रागाच्या भरात त्यांनी काही वक्तव्येही केली होती. त्यानंतर त्यांनी स्वत: ला जया अमिताभ बच्चन या नावाने ओळख सांगताना दिसल्या. आपल्या पतीवर आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
कंगना राणावतचा जया बच्चन यांच्यावर हल्लाबोल Kangana On Jaya Bachchan ।
कंगना राणावतने एका मुलाखतीत जया बच्चन यांच्या नावासोबत अमिताभ यांचेही नाव घेतल्याने झालेल्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली. कंगनाने म्हटले की, ‘ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. निसर्गाने स्त्री-पुरुष वेगवेगळे निर्माण केले आहेत. त्यांच्यात फरक आहे. पण आजकाल जे घडत आहे ते म्हणजे स्त्रीवादाच्या नावाखाली काही स्त्रिया चुकीच्या दिशेने जात आहेत. आपला समाज अहंकाराकडे वाटचाल करत आहे. जे पूर्णपणे चुकीचे आहे. माझी ओळख कुठेतरी हरवल्याचे लोकांना वाटते. त्यांना पॅनिक अटॅक येतो, असेही कंगनाने म्हटले.
शेतकरी आंदोलनावरही केलं होतं भाष्य…Kangana On Jaya Bachchan ।
कंगनाने एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनावर गंभीर आरोप केले होते. तिने म्हटले की, शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्याठिकाणी बलात्कार झालेत, अनेकांच्या हत्यादेखील झाल्या आहेत. केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयक माघारी घेतले नसते तर देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या. कंगनाच्या या वक्तव्यावर शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली. तर, भाजपनेही जबाबदारी झटकत कंगनाच्या वक्तव्याशी संबंध नसल्याचे म्हटले.





