Supriya Sule: “शरद पवार निवृत्त होणार नाहीत, राज्यसभेची 5 वर्ष अजून बाकी”; सुप्रिया सुळेंनी केले स्पष्ट
Supriya Sule: सुप्रिया सुळेंकडून भूमिका स्पष्ट

Supriya Sule : एकीकडे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तचे वृत्त समोर येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवार निवृत्त होणार नाहीत, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावले आहे.
शरद पवार यांच्या संदर्भात एका वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीवर सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “शरद पवार निवृत्त होणार नाही. कोणी निवृत्त व्हायचे हे जनता ठरवणार. शरद पवार यांच्या राज्यसभेची अजून ५ वर्षे बाकी आहेत, मग शरद पवार निवृत्त कसे होतील?”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यामुळे आता शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चेला पुर्णविराम लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवारांना फोन
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार हे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतानाच अचानक त्यांची तब्येत बिघडली होती. त्याचवेळी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना फोन केला होता, तेव्हा ‘आपण विश्रांती घ्या सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोनवर म्हटले होते. यावरून पवार यांच्या निवृत्तीचे स्वतः पंतप्रधानांनी संकेत दिल्याचा अर्थही काढला गेला होता. मात्र यावर सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
हेही वाचा:





