महिलेच्या विनयभंग प्रकरणी डॉक्टरला पोलीस कोठडी

पुणे – मुलाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर अनिरुध्द आंनद गायकर (वय-30,रा.कसबा पेठ) यास अटक केली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
पीडित 36 वर्षीय महिलेने याबाबत फरासखाना पोलिसात फिर्याद दिली आहे. 9 ते 14 एप्रिल या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादीचा वर्षाचा मुलगा काही कारणास्तव आजारी पडल्याने उपचारासाठी त्याला कसबा पेठेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गायकर हा वारंवार मुलास तपासणी करण्याचे बहाण्याने त्याचे खोलीत येऊन महिलेच्या अंगाला स्पर्श करत होता. महिला झोपली असताना त्याने तिचा विनयभंग केला. तिच्या व्हॉटसअपवर “यु आर ब्युटीफुल’ असा मेसेज करुन महिलेस त्रास देण्याचा प्रयत्न केला.
याबाबत महिलेने तक्रार केल्यानंतर रुग्णालयाने डॉक्टरला समज दिल्यानंतर त्याने महिलेस माफीनामा लिहून दिला होता. परंतु त्यानंतर ही तो महिलेस त्रास देत असल्याने याबाबत महिलेने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयात त्याच्या वतीने अॅड. हेमंत झंजाड यांनी काम पाहिले.





