Doctor Girl Suicide Case : फलटण डॉक्टर सुसाईड केसमध्ये हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; पीएसआय बदनेचा जामीन मंजूर
Doctor Girl Suicide Case : उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचा निकाल; दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर संशयित आरोपीला अटीशर्थींसह जामीन.
Updated On:

Doctor Girl Suicide Case – फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवती आत्महत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने यास मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती सचिन एस. देशमुख यांनी हा आदेश दिला आहे.
जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बदने याने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती देशमुख यांनी बदनेला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर व एक किंवा दोन जामीनदारांच्या अटीवर जामीन मंजूर केला.
जामीन मंजूर करताना साक्षीदारांवर दबाव टाकू नये, पुराव्याशी छेडछाड करू नये, न्यायालयीन तारखांना हजर राहावे आणि आवश्यक कागदपत्रे तपास अधिकार्यांना सादर करावीत, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत. बदने याच्या वतीने अॅड. गिरीश वाणी व निरंजन ढाके यांनी युक्तिवाद केला. सरकारच्या वतीने अॅड. पी. पी. देवकर यांनी बाजू मांडली.





