Ashok Kharat : अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; त्याच्याविरोधात केस लढण्यास सरकारी वकील अजय मिसरांचा नकार कारण…
Ashok Kharat : अशोक खरातला नाशिक न्यायालयान 14 दिवसांची न्यायायलीन कोठडी सुनावली असून, सरकारी वकील अजय मिसर यांनी केस लढण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे.

Ashok Kharat : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला आज पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयानी कोठडी सुनावली आहे. त्यानुसार त्याची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे.
अशातच अशोक खरातविरोधात एक मोठी घडामोड घडली आहे. सरकारी वकील अजय मिसर यांनी अशोक खरातविरोधात एसआयटीची केस लढण्यास असमर्थता दाखवली आहे.
एसआयटीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती. मात्र सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिला आहे.
कारण काय? Ashok Kharat

Ashok Kharat : अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; त्याच्याविरोधात केस लढण्यास सरकारी वकील अजय मिसरांचा नकार कारण…
2011 मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला, रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सर्व खटले तसेच अन्य महत्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ व न्याय देता येणार नसल्याने कारण सांगत विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केस लढण्यास नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
खरातविरोधात नवनव्या तक्रार Ashok Kharat
अशोक खरातचा पाय दिवसेंदिवस खोलात चालला आहे. त्याच्याविरोधात महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणुकीस इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अनेक तक्रारी देखील त्याच्याविरोधात समोर येत आहेत.
दरम्यान, जमीन व्यवहार प्रकरणी शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती आहे. काल रात्री एसआयटीच्या पथकाने अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे.
तसेच एसआयटीकडून अशोक खरातचा पुण्याचा सीए, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफाला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येते याकडे लक्ष असणार आहे.





