Prathmesh Parab : माझी लक्ष्मी.! लक्ष्मीपूजनाला प्रथमेश परबने केली बायकोचीच पूजा; चाहत्यांकडून होतंय खास कौतुक
प्रथमेशने २४ फेब्रुवारी २०२४ रोजी क्षितिजा घोसाळकर हिच्याशी लग्नगाठ बांधली. तेव्हापासून ही जोडी सोशल मीडियावरही सक्रिय असून, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Prathmesh Parab : दिवाळी म्हटलं की घराची सजावट, दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध आणि लक्ष्मीपूजनाचा मंगलमय सोहळा असतो. या दिवशी प्रत्येकजण आपल्या घरात सुख, समृद्धी आणि धनलक्ष्मीचं स्वागत करतो. पण मराठी मनोरंजनविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याने यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेल्या कृतीने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. घरातील धन-संपत्तीची पूजा करण्याबरोबरच त्याने आपल्या आयुष्यातील खऱ्या लक्ष्मीचाही सन्मान केला.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘टाइमपास’ फेम ‘प्रथमेश परब’ आहे. प्रथमेशने पत्नी क्षितिजाचं औक्षण करत तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. विशेष म्हणजे, हा सुंदर क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये फक्त दोन शब्द लिहिले ‘माझी लक्ष्मी!’ त्याचा हा व्हिडीओ सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पत्नीचं औक्षण !
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानिमित्त प्रथमेश परबने आपल्या घरी एक खास क्षण अनुभवला. त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पत्नी क्षितिजा सोफ्यावर बसलेली दिसते. प्रथमेश तिचं औक्षण करताना दिसत असून, या क्षणाला त्याने दिलेलं ‘माझी लक्ष्मी’ हे कॅप्शन विशेष भाव खाऊन जात आहे.
सणासुदीला घरातील लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा असते. मात्र, आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि प्रेम घेऊन येणाऱ्या जोडीदाराचा सन्मान करणारी प्रथमेशची ही कृती चाहत्यांना भावली आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
प्रथमेश आणि क्षितिजा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे खास क्षण शेअर करत असतात. त्यांच्या गमतीशीर रील्सपासून रोमँटिक फोटोपर्यंत अनेक गोष्टी चाहत्यांना आवडतात. आता लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओनेही लक्ष वेधून घेतलं आहे.
‘टाइमपास’मधील दगडू ते लोकप्रिय अभिनेता; प्रथमेशची कारकीर्दही चर्चेत
प्रथमेश परबला ‘टाइमपास’ या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील दगडू या भूमिकेने त्याला घराघरांत पोहोचवलं. त्यानंतर त्याने ‘टकाटक’, ‘डार्लिंग’, ‘डिलिव्हरी बॉय’, ‘उर्फी’ आणि ‘लालबागची राणी’ अशा विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मराठी चित्रपटांसोबतच हिंदी प्रोजेक्ट्समध्येही त्याने काम केलं आहे.
प्रथमेशने २४ फेब्रुवारी २०२४ रोजी क्षितिजा घोसाळकर हिच्याशी लग्नगाठ बांधली. तेव्हापासून ही जोडी सोशल मीडियावरही सक्रिय असून, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.






