Diwali firecrackers : मुंबईत रात्री 10 वाजेनंतर फटाके फोडण्यास बंदी !
Updated On:

मुंबई – दिवाळीच्या सणामध्ये मुंबईतील वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. येथील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेने दिवाळीत फटाके फोडण्यासाठी काही नियम निश्चित केले आहेत. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
मुंबईतील वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने बीएमसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बीएमसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईकर रात्री 10 नंतर फटाके फोडू शकत नाहीत.
याशिवाय फटाके कमी वाजवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. फटाके रस्त्यावर आणि गर्दीच्या ठिकाणी न फोडता मोकळ्या जागेत फोडावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.





