दिव्यांका त्रिपाठीची तब्येत बिघडली; शेअर केला फोटो…

Divyanka Tripathi Health Update | टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी पती विवेक दहियासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत. मात्र घटस्फोटाच्या बातम्या खोट्या असल्याचे विवेकने सांगितले आहे. याचदरम्यान आता तिची तब्येत बिघडल्याची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. ज्यानंतर चाहत्यांनी तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दिव्यांकाने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये थर्मामीटरचा फोटो शेअर करत तिने काही दिवसांपासून आजारी आहे आणि टेस्ट केल्यानंतर डेंग्यू झाल्याचे कळले. लवकरच बरी होईल अशी आशा असल्याचे सांगितले.
दिव्यांका त्रिपाठीला काही दिवसांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. १०२ डि.से. ताप असूनही, दिव्यांका या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिली. पण त्यावेळी तिला डेंग्यू झाल्याचे पूर्णपणे माहित नव्हते.
दिव्यांकाने अभिनेता विवेक दहियासोबत ८ जुलै २०१६ रोजी लग्न केले. आता लग्नाच्या ८ वर्षानंतर ही दोघे वेगळे होणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. अलिकडेच विवेक एअरपोर्टवर एका दुसऱ्या मुलीसोबत दिसला होता. त्यावरून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र यावर आता विवेकने मौन सोडले आहे.
विवेक म्हणाला, ‘मला खूप मजा येत आहे. दिव्यांका आणि मी हसत होतो. आम्ही आईस्क्रीम खात असताना ते वाचत होतो. आम्हाला वाटलं जर अजून थोडा वेळ असता तर आम्हीही पॉपकॉर्न ऑर्डर केलं असतं. तिथे एंटरटेंमेंट आणि दुसरे काही नाही. मी युट्यूब व्ह्लॉगिंग देखील करतो. मला माहित आहे क्लिकबेट म्हणजे काय? म्हणून मला हे बिझनेस मॉडेल खूप चांगले समजते. जर तुम्ही खळबळजनक पोस्ट केल्या तर लोक येतील. तो व्हिडिओ पाहतील. पण त्यात काहीही घडत नाही. जर तुम्हाला काही अवास्तव वाटले तर व्ह्यूज वाढवू नका. निरुपयोगी बातम्या येत राहतात.”
दरम्यान, दिव्यांकाने ‘बनू में तेरी दुल्हन’, ‘ये है मोहब्बतें’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये आणि ‘खतरों के खिलाडी’सारख्या साहसी रिॲलिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे. Divyanka Tripathi Health Update |






