Divyanka Tripathi: १० वर्षांनंतर ‘इशिता भल्ला’ आई होणार? दिव्यांका-विवेकच्या घरी येणार आनंदाची बातमी!
Divyanka Tripathi लग्नाच्या जवळपास १० वर्षांनंतर त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या दिव्यांका तिच्या प्रेग्नेंसीचा सुंदर काळ एन्जॉय करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Divyanka Tripathi: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी दहिया हिच्याबाबत एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली दिव्यांका आता आयुष्यातील नव्या टप्प्याकडे वाटचाल करत असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांका आणि तिचे पती विवेक दहिया लवकरच आई-वडील होणार आहेत.
लग्नाच्या जवळपास १० वर्षांनंतर त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या दिव्यांका तिच्या प्रेग्नेंसीचा सुंदर काळ एन्जॉय करत असल्याची माहिती समोर आली आहे. काही रिपोर्टनुसार, ती सहाव्या किंवा सातव्या महिन्यात आहे. मात्र, या संपूर्ण बातमीबाबत दिव्यांका आणि विवेक यांनी अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. Divyanka Tripathi
म्हणूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे. अनेकांना वाटत आहे की, हे दोघे लवकरच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करून ही ‘गुड न्यूज’ अधिकृतपणे जाहीर करतील. Divyanka Tripathi

Divyanka Tripathi and Vivek Dahiya
दिव्यांका आणि विवेक यांची प्रेमकहाणीही खूप खास आहे. दोघांची भेट ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. सुरुवातीला मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जुलै २०१६ मध्ये त्यांनी भोपाळमध्ये धूमधडाक्यात लग्न केले. तेव्हापासून ही जोडी टेलिव्हिजन इंडप्रेग्नेंसीस्ट्रीतील आदर्श जोडप्यांपैकी एक मानली जाते. चाहते त्यांना प्रेमाने ‘दिवेक’ असेही म्हणतात.
या दोघांनी नेहमीच आपली वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवण्यावर भर दिला आहे. ते सोशल मीडियावर फार कमी वैयक्तिक गोष्टी शेअर करतात. त्यामुळेच ही ची बातमी आतापर्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. मात्र आता ही चर्चा जोर धरू लागल्याने चाहत्यांचे लक्ष या जोडीकडे लागले आहे.
सोशल मीडियावर ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी दिव्यांका आणि विवेक यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. ‘इशिता भल्ला’ या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या दिव्यांकाला आता आईच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
जर ही बातमी खरी ठरली, तर दिव्यांका आणि विवेक यांच्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर आणि खास क्षण ठरेल. सध्या मात्र सर्वांचे लक्ष त्यांच्या अधिकृत घोषणेवर आहे. चाहते त्या खास पोस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.





