nagar | राहुरी फॅक्टरीत जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा

राहुरी, (प्रतिनिधी) – राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने रविवार दि. १९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील उदयोन्मुख कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी वाव मिळावा, या हेतूने वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने ही नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेसाठी सामूहिक नृत्य गटास प्रथम पारितोषिक ११,००१ रुपये मुंबई उच्च न्यायालयाचे विधिज्ञ शशिकांत संसारे, द्वितीय पारितोषिक ७००१ रुपये मुंबई येथील पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, सामूहिक नृत्य लहान गट प्रथम पारितोषिक ७००१ रुपये सत्यजित कदम फाउंडेशचे अजित चव्हाण व भारत शेटे यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक ५००१ रुपये अनिल डोळस यांच्याकडून दिली जाणार आहेत.
सोलो नृत्य मोठा गट प्रथम पारितोषिक ७००१ रुपये साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, द्वितीय पारितोषिक इलेक्ट्रिकलचे अमोल तुरकणे, प्रशांत डुक्रे, संदीप निभे तर तृतीय पारितोषिक ४००१ ऋषिकेश इंटरपायजेसचे निखिल कुऱ्हाडे यांच्याकडून दिली जाणार आहे.
सोलो नृत्य लहान गटास प्रथम पारितोषिक ५००१ हारून पठाण, द्वितीय पारितोषिक ४००१ रुपये स्वराज्य उद्योग समूहाचे अध्यक्ष किशोर गडाख, तृतीय पारितोषिक ३००१ रुपये कदम पेंट्सचे प्रसाद व सचिन कदम तर चतुर्थ २५०१ रुपये साई अर्णव सॉ मिलचे जालिंदर दौंड यांच्याकडून दिली जाणार आहे.विशेष पारितोषिक सौजन्य आंबिका स्टोन क्रेशरचे मयुर भोसले व साई स्टोन क्रेशरचे अजय गोसावी व आदिनाथ कडू यांनी केले आहे.





